बाकी 'द्रौपदी, जी आधीच पाच जणांची बायको होती तिलाही काय फरक पडला असता?' हे वाक्य वाचून शिसारी येण्याबद्दल पूर्णतः सहमत. पण मग बायकोचे वर्णन भिक्षा म्हणून करू शकणाऱ्या पांडवांबद्दल, ती भिक्षा वाटून घ्या म्हणून सांगणाऱ्या आणि सत्यपरिस्थिती कळल्यावरही आपली आज्ञा मागे न घेणाऱ्या कुंतीबद्दल आणि ती आज्ञा बैलोबासारखी शिरसावंद्य मानून द्रौपदीला 'वाटून घेणाऱ्या' पुन्हा पांडवांबद्दल काय म्हणता येईल?
माझं देखील हेच म्हणणं आहे की यज्ञातून निर्माण झालेली, अतिशय निपुण, स्वाभिमानी, प्रतिव्रता असा लौकिक असणाऱ्या द्रौपदीने झाल्या प्रकाराबद्दल उघड बोलणे तर सोडाच पण साधी नापसंती देखील व्यक्त करू नये? शिवाय जिच्यामुळे हे सगळं झालं त्या कुंतीनेही स्वतः एक स्त्री असताही हे होऊ द्यावं? "मी माझं म्हणणं मागं घेते" असं ती बोलली असती तर तिच्या मुलांनी ते निश्चितच मानलं असतं. पण यातलं काहीच झालं नाही. केवळ तोंडातून शब्द गेले आणि ज्येष्ठांचा आदर म्हणून पाच जणांशी विवाह करण्याला काही आधार,संदर्भ आहे का? आजच्या परिस्थितीच्या तुलनेत त्या वाक्याची शिसारी तर येईलच ते रानटीपण वाटेल पण त्या काळात ते तसं वाटणार नाही.
एवढा दीर्घ प्रतिसाद लिहल्याबद्दल आभार.