मागे एकदा सुनिता या मैथिलीच्या गोष्टीत ती बाई अनेक अन्यायानंतर विसा परमिट नसताना नोकरी धरते तेव्हा आपणच विरोधी सूर उठवल्याचे आठवते.

माझा येथे काहीतरी गैरसमज झाला. बहुधा तो प्रतिसाद कोणा माजी-मनोगतीने दिला होता आणि तो तेथून आता गेलेला आहे. आपण ते नसावेत.  

पण कथेतील वाक्य असे होते...

मधूजवळ फार दिवस राहणं सुनिताला शक्य नव्हतं. तिनं भारतीय कॊट्रॅक्टरला गाठून खोटानाटा रेझ्युमे बनवला आणि एका सॊफ्टवेअर कंपनीत नोकरी मिळवली. तिनं सॊफ्टवेअर मधलं काही ज्ञान नसताना तिथे कसं काय निभावलं माहित नाही, पण आज त्याच कंपनीत ती पूर्णवेळ काम करते.

आपल्यावर अन्याय होतो म्हणून खोटेपणा करणे याला कायदा भीक घालत नाही. ही व्यक्ती पकडली गेली असती तर तिला अपराधाची शिक्षा झालीच असती.

परशुरामांनी प्रतिज्ञा केली होती, ती माहित असून कर्णाने जे काही केले त्याला जर त्याची बाजू मांडून कोणी उदात्तीकरण करत असेल तर ते खेदजनक आहे.