माझा येथे काहीतरी गैरसमज झाला. बहुधा तो प्रतिसाद कोणा माजी-मनोगतीने दिला होता आणि तो तेथून आता गेलेला आहे. आपण ते नसावेत.

गैरसमज दूर झाला याबद्दल बरे वाटले.

ही व्यक्ती पकडली गेली असती तर तिला अपराधाची शिक्षा झालीच असती.

यात वाद नाही.

परशुरामांनी प्रतिज्ञा केली होती, ती माहित असून कर्णाने जे काही केले त्याला जर त्याची बाजू मांडून कोणी उदात्तीकरण करत असेल तर ते खेदजनक आहे.

उदात्तीकरणाचा प्रश्नच नाही. केवळ काय झाले असू शकेल, कर्णाची यामागची मनोप्रक्रिया काय असू शकेल याचा ऍनालिसीस [मराठी?] करण्याचा प्रयत्न आहे.

असो.