येथे चर्चा लेखकाच्या सोकॉल्ड व्ह्यूबद्दल चालली नसून कर्णाला असे मांडल्याने तो बरोबर ठरतो का त्यावर आहे.
बरोबर ठरण्याचा प्रश्नच नाही. फक्त त्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू दिसून येतो, एवढेच.
कर्णाबद्दलच म्हणाल तर तो एक महत्त्वाकांक्षी, कर्तबगार, मूळचा सद्गुणी परंतु परिस्थितीच्या कचाट्यात सापडलेला हतबल इसम होता असे वाटते.हे आपण कशावरून ठरवलेत? मृत्युंजय वाचून?
कदाचित तो प्रभाव नाकारता येणार नाही, पण असे आपले माझे इंप्रेशन झाले हे मान्य करणे प्राप्त आहे.
पण मग बायकोचे वर्णन भिक्षा म्हणून करू शकणाऱ्या पांडवांबद्दल, ती भिक्षा वाटून घ्या म्हणून सांगणाऱ्या आणि सत्यपरिस्थिती कळल्यावरही आपली आज्ञा मागे न घेणाऱ्या कुंतीबद्दल आणि ती आज्ञा बैलोबासारखी शिरसावंद्य मानून द्रौपदीला 'वाटून घेणाऱ्या' पुन्हा पांडवांबद्दल काय म्हणता येईल?हे आपण लिहावेत याचे खरंच वाईट वाटले. इथे कर्ण योग्य की पांडव की कुंती हा प्रश्न आहे का? मी पुन्हा लिहिते चूक हे चूक असते आणि बरोबर हे बरोबर - मग पांडव असोत की कौरव - इथे मात्र प्रत्येकजण हा वाईट तसा तो वाईट मग याचा वाईटपणा त्याच्या वाईटपणापेक्षा कमी कसा हे दाखवतोय. इथे प्रश्न फक्त दौपदीचा आहे. दौपदीला पाचांची पत्नी होण्याचा आदेश आवडला नव्हता पण मान तुकवावी लागली. कर्णाला तिचे ऑफरींग केले असते तर तिला ते ही कदाचित मानावे लागले असते.
पण म्हणून कोणी असे म्हणावे की ती पाचांची पत्नी होती,सहाव्याची असती तर काय फरक पडला असता. सौरभांना जे लिहायला टाळले ते येथे लिहिते. पुरुष असा विचार करतो का की 'माझी बायको एकाची पत्नी आहे, दुसऱ्याची असेल तर तिला काय फरक पडतो?' दुसरे उदाहरण पाहिले तर वेश्याही आपली गिऱ्हाईके आपल्या मर्जीने निवडते, दौपदीला तर आपला इतिहास पाचांची पत्नी असून साध्वी मानतो. (ते का मानतो हे मृत्युंजयसारख्या कादंबऱ्या वाचून कळणे कठिण आहे.) तिच्याविषयी असे उद्गार मला खरंच शिसारी आणण्यागत वाटले.
सर्वप्रथम 'पाचांची पत्नी होती, सहाव्याची असती तर काय फरक पडला असता' या विधानाचे कोणत्याही प्रकारे जस्टिफिकेशन करण्याचा हा प्रयत्न नाही. (गैरसमज नसावा!) एकंदरीतच समाजाची स्त्रियांबद्दलची विचारधारा किती सडकी होती, (आणि बाय द वे समाजाची विचारधारा एकंदरीत सडकी होती याने काहीही जस्टिफाय होत नाही!) एवढेच दाखवायचा प्रयत्न होता; याने हे केले मग त्याने ते केले तर काय फरक पडतो असे म्हणण्याचा कोणताही उद्देश नव्हता. कदाचित हा प्रयत्न निष्फळ ठरला, मला जे मांडायचे होते ते मी समर्पकपणे मांडू शकलो नाही आणि त्यातून भलताच (मला अभिप्रेत नसलेला) अर्थ निघू शकला याचे मनापासून वाईट वाटते. ते विचार शिसारी आणण्यागत होते याबद्दल दुमत नाही.
बाय द वे, वेश्या आपली गिर्हाइके मर्जीने निवडू शकत असेल याबद्दल दाट शंका आहेत, परंतु तो मुद्दा येथे गौण आहे.
जे समाजव्यवस्थेनुसार बरोबर आहे ते बरोबर म्हणावे लागते जे चुकीचे आहे ते चुकीचे.
यावर निबंध लिहिता येईल. पुन्हा कधीतरी.
कर्ण चूक होता तर पांडव कोठे बरोबर होते अशा आशयाचे येथील एक एक प्रतिसाद पाहता
असे काहीही म्हणण्याचा येथे उद्देश नाही. निदान माझा तरी.
बाकी पुन्हा कधीतरी.