पण मग बायकोचे वर्णन भिक्षा म्हणून करू शकणाऱ्या पांडवांबद्दल, ती भिक्षा वाटून घ्या म्हणून सांगणाऱ्या आणि सत्यपरिस्थिती कळल्यावरही आपली आज्ञा मागे न घेणाऱ्या कुंतीबद्दल आणि ती आज्ञा बैलोबासारखी शिरसावंद्य मानून द्रौपदीला 'वाटून घेणाऱ्या' पुन्हा पांडवांबद्दल काय म्हणता येईल?

मलाही हा प्रश्न बरेच दिवस होता, आणि काल ह्या चर्चेनंतर सगळी पुस्तके धुंडाळली असता ईरावती कर्व्यांचे युगांत सापडले (तेही इथे अमेरीकेत!) यामध्ये वरील विचाराचा असा निष्कर्ष काढला आहे की त्यामुळे पांडवांमध्ये फुट पडणार नाही; दुर्योदधाने कौंतेय व मांद्रेय यांच्यात पुढे काही डाव रचायच्या आधीच कुंतीने त्याची काळजी घेतली.
परत पणामध्ये तिला अर्जुनाने जिंकली होती, पण मोठ्या भावाआधी लहानाने लग्न करणे त्याकाळी मोठे पाप करण्यासारखे होते, व धर्म व भीमाला इतक्या तोलामोलाच्या मुली मिळणेही अवघड झाले असते. (अर्थात इतका सगळा विचार कुंतीने त्या १-२ मिनिटात केला असावा का, हाही प्रश्नच आहे.)
पुढे हीच वरील गोष्ट कर्णाने दुर्योदधानाला सांगितली.