नमस्कार गिरीश,

रचना छान केलीस... पण एक सल्ला देऊ इच्छितो... कदाचित आवडणार नाही तुला... पण एक हितचिंतक म्हणून सांगावंस वाटलं.

रिप्लाय करते वेळी तो मूळ कवितेची टर उडवणारा नसावा... "खा आवडीने आता तूच  तुझ्या" हा शब्दप्रयोग जरा उर्मट नाही वाटत का?

मी तुझ्यावर रागावलो नाही अथवा टीका देखिल करीत नाही... पण एक स्वभाषिक म्हणून मैत्रिचा सल्ला देतो आहे... कृपया शांत डोक्याने विचार कर!

बाकी तुझ्यात प्रतिभा चांगली आहे... तेव्हा कवितालेखन चालू ठेव... मला आवडेल तुझं लेखण वाचायला... धन्यवाद मित्रा.

- चंद्रा