हे दोन्ही कॅमेरे 'प्रोफेशनल्स चे वाटत नाहीत; ते एस एल आर नसून 'दृश्य बघा आणि टिपा' (पॉइंण्ट ऍण्ड शूट) या प्रकारचे आहेत.
निकॉन चांगले आहेत हे नक्की पण भारताबाहेर अनेक बाजार पेठांत कॅनन व ऑलिंपस अधिक प्रचलित आहेत किंबहुना जगतिक बाजार्पेठेत कॅनन चा वाटा मोठा आहे. पहिला स्वयंदृश्यसाधक (ऑटोफोकस एस एल आर) हा कॅनन इ ओ एस च्या रुपाने आला. निकॉन उत्पादने पूर्वीपासून म्हणजे चित्रफितिका कॅमेऱ्यांपासून भारतात रुजलेले आहेत व संख्येने भरपूर असल्याने त्याचे सुटे भाग मिळतात. त्याचप्रमाणे भारतात हेच कॅमेरे प्रामुख्याने विकले जात असल्याने त्या साठीची भींगे व अन्य उपकरणए सुलभतेने मिळू शकतात.मात्र हल्ली पॅनासॉनिक, ऑलिंपस वगरे भारतात हमीसह विक्री करतात. पॅनासॉनिक च्या ल्युमिक्स श्रेणीतल्या कॅमेऱ्यांचे रंगग्रहण अप्रतिम आहे, रंगसंगती अगदी मूळबरहुकुम व जिवंत वाटते. अनेक व्यापारी एस एल आर व्यतिरिक्तचे निकॉन फार तकलादू असल्याचे सांगतात - विशेषतः कूलपिक्स मालिका. ते खरे असावे. सध्या ही पेठ सोनीने बळकावली आहे. कॅननही पॉवरशॉटही या प्रकारात बरा चालतो आहे. पॅनासोनिक च्या ल्युमिक्स ने तर व्यावसायिकांची पसंती मिलवली आहे. फुजीचे काही कॅमेरे किंमतीच्या मानाने छानच आहेत, मात्र इथे अजून त्यांचा जम बसलेला नाही.
अर्थात उद्देश काय हे निश्चित असेल तर कॅमेरा ठरवणे सोपे जाते. लोक ९९टक्के चित्रे एकमेकाला इ-मेल करायला वापरतात वा ४ x ६ आकाराच्या प्रती घेतात आणि कॅमेरा मात्र मेगापिक्सेल च्या परिमाणात ठरवितात. डिजिटल कॅमेऱ्यांचे वैशिष्ठ्य असे की जे प्रोफेशनल नाहीत पण ज्यांना प्रकाशचित्रणाची आवड आहे व ज्यांना खर्चिक एस एल आर घ्यायचे नसतील त्यांना उत्तम परिणाम देणारे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. अर्थात एस एल आर व निरनिराळी भिंगे यांना तोड नाही
गमतीचा भाग असा की अजुनही पट्टीचे प्रकाशशित्रकार डिजिटल पेक्षा आधीच्या प्रतिमाग्राही फितिका वापरणाऱ्या कॅमेऱ्याला श्रेष्ठ मानतात व त्याचे चित्रण अधिक उत्तम दर्जाचे मानतात. काळाबरोबर जाताना डिजिटल घेतले तरी ही मंडळी आपले जुने कॅमेरे काढत नाहीत. पूर्वी नवा एस एल आर घेताना आधिचा काढला जत असे.