चांगले निरीक्षण आहे. यावरून एक जुनी जाहिरात आठवली. दोन मुली शाळेच्या बाहेर उभ्या राहून पत्रके वाटत असतात. पत्रके वाचून लोकांनी कुठल्याशा धर्मादाय कामासाठी (चॅरिटी) देणगी द्यावी म्हणून एकीच्या हातात एक डबाही असतो. बहुतेक सगळे लोक पत्रके न वाचताच त्यांचा बोळा करून फेकून देतात, म्हणून वैतागलेल्या त्या दोघींना एक चॉकलेट खाल्ल्यावर (पर्क?) एक कल्पना सुचते. आपल्या कामाच्या घाईत गुंतलेल्या एका माणसाला त्या पत्रकाचा बोळा करून देतात. क्षणभर गोंधळलेला तो माणूस काय ते समजतो आणि पत्रक वाचून डब्यात देणगीकरता नोट सरकवतो.

बऱ्याचदा स्थानकांवर बाबा बंगालींची पत्रके वाटणारे लोक असत. त्यांच्याकडून ते घेऊन फाडून टाकण्याचे सत्कार्य एक मैत्रीण करत असे, याची आठवण झाली. तितक्याच कोण्या एका व्यक्तीची फसवणूक व्हायची शक्यता काही अंशांनी कमी झाली, असे तिचे यामागचे बिनतोड तर्कशास्त्र होते .