प्रतिसादाबद्दल सर्वांचे अनेक धन्यवाद. मूळ चर्चा पुणे आणि मुंबई यांच्याबद्दल होती. पुण्याचा असूनही मला मुंबईच्याही काही गोष्टी आवडतात. पण सहसा पुणेकर असे सांगत नाहीत असा अनुभव आहे :) मला मुंबईबद्दल कायकाय आवडते हे सांगताना सहज विचार आला की याचे उलटे टोक काय असेल? याबद्दल लेखात अर्थातच आतिशयोक्ती आहे आणि याकडे विनोद/विरंगुळा म्हणूनच पहावे. यावर नंदनचे  विवेचन सुंदर आहे. आपण ज्या वर्तुळात असतो त्याच्याशी इमान राखण्याचा प्रयत्न करतो. मग जसजशी वर्तुळे बदलतात किंवा मोठी होत जातात तसतसे आपले निष्कर्ष बदलत जातात.

विसू. लेखातली गुलाम अलीची गझल मी खरेच शोधतो आहे. कुणाकडे एम्पी३ असेल तर कृपया कळवावे.