'बघा आणि टिपा' प्रतीच्या सर्व कॅमेऱ्यांचा राजा म्हणजे सोनी. फूजीफिल्म, ऑलिंपस, कोनिका, प्रीमिअर नि आता कॅनॉन इतक्या [ब आ टि]कॅमेऱ्यांची वाट लावल्यानंतर मी छातीठोकपणे सांगू शकतो की सोनीचा 'रेटिना' सगळ्यात सेन्सिटीव्ह आहे. 'प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट [खरं तर सुंदर]' या ओळीची प्रचिती अगदी स्वस्तातला सोनी वापरतानाही येते.
पण तुमच्याकडे आधीचा कॅमेरा एसेलार असल्याने मला वाटतं की तुम्हाला डिजीटल चित्रांकनही वरच्या पातळीवरचं करायचं डोक्यात असावं. या प्रांतात सोनी फारसा लोकप्रिय नाही.