जयंतराव,
छान....
तुमच्या या लेखावरून मला एक किस्सा आठवला...कवी अशोकजी परांजपे यांच्यासंदर्भातील...असाच कधीतरी दूरदर्शनवर किंवा आकाशवाणीवर ऐकलेला.
त्यांचं एक गाणं आहे...केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर...कुणीतरी अशीच शंका काढली..काहीतरीच काय, केतकीच्या बनात कधी मोर नाचतो का...? कविवर्यांनी अगदी जीव तोडून सांगितलं...केतकीच्या बनात मोर नाचलेला मी स्वतः पाहिलेला आहे....पण समोरच्याची समजूत पटेल तर !
आपल्या नजरेआड बरंच काही घडत असतं, अस्तित्वात असतं, पण कुणी सांगूनही त्यावर अनेकदा आपला विश्वास बसत नाही...मानवी स्वभाव, दुसरं काय...! असो...त्या बिचाऱया चिंट्याला येडचाप ठरवून त्या चिंग्या मोकळ्याही झाल्या...तो चिंट्या मला समस्त कविजातीचा प्रतिनिधीच वाटला...! बिचारा... आणि त्या चिंग्या कोण वाटल्या सांगू...? जाऊ द्या...!!!
............
जयंतराव, आणखी एक फार फार जुनी कविताही मला आठवली...
हणमंताची निळी घोडी
येता-जाता कमळे तोडी
ही कविता थोर कथाकार जी. ए. कुलकर्णी आणि त्यांचे समकालीन समीक्षक माधव आचवल या दोघांच्याही लेखनात मला आढळली....निळी घोडी असते तरी का...? असा प्रश्न विचारणाऱया चिंग्या यो दोघांना भेटल्या होत्या किंवा कसे, ते मात्र न कळे !
............
असो...पण साधाच अनुभव फार छान शब्दबद्ध केलात... अभिनंदन...आणि नाराजगीही ! कशाबद्दल...? अहो, तुम्ही नाराजीऐवजी नाराजगी हा शब्द वापरल्याबद्दल...!
............