आपले विचार अतिशय छान आहेत. विचार करण्यायोग्य. अशाही शक्यता असू शकतात. पण सर्वात अखेरीस आपण लिहिले आहे की
तोडा फोडा आणि राज्य करा ही इंग्रजांची कुटनीति होती.
मुस्लिम लोकांच्या फुटीर वृत्तीवर पांघरूण घालण्यासाठी हे एक वाक्य आपल्याला लहानपणापासून शिकवले गेले आहे. त्यांनी आपल्यावर राज्य केले. ब्रिटीश आल्याने ते राज्य गेले. स्वतंत्र भारत हिंदूंच्या ताब्यात गेलेला यांना कसा खपेल? मग नवीन राष्ट्र हवेच. तसे त्यांनी 'डायरेक्ट ऍक्शन' करून मिळवलेच. पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान असे दोन टोकांना एकाच देशाचे तुकडे निर्माण झाले. काय झाले पुढे. २५ वर्षे होण्याआधीच बांग्लादेशच्या रूपात पाकिस्तान फुटालाच ना? तिकडे काय फोडा आणि झोडा करायला ब्रिटीश होते?
ते तर भारत सोडून गेले परंतु आपल्या पाठिमागे भ्रष्ट राजकारण्यांच्या आणि नोकरशाहीच्या रुपाने आपली अनौरस औल्यादी सोडून गेलेले दिसतायत
नोकरशाही ही ब्रिटीशांनी दिली असली तरी भ्र्ष्टाचारासाठीही ब्रिटीशांना जबाबदार धरणे योग्य नाही. ब्रिटीशांची तळी उचलण्याचा हा प्रयत्न नाही. ब्रिटीशांमुळे देशाचा किती फायदा / तोटा झाला, 'भारत ' नावाचा देश तरी होता का? ते नसते आले तर आजचा भारत अस्तित्त्वात आला असता की युरोप प्रमाणे लहान लहान देश उपखंडात असते हा चर्चेचा वेगळा विषय होऊ शकतो.