महिलांना किंवा वृद्धांना होणाऱ्या अशा अनेक त्रासांचे/अनुभवांचे लेख चतुरंग मध्ये येत असतातच. काही महिन्यांपूर्वी टाटा इंडिकॉम कंपनीच्या पुण्यातील एका ग्राहकाला आलेल्या वाईट अनुभवाची बातमी पहिल्या पानावर छापून लोकसत्ताने धमाका उडवला होता. पुढे टाटा इंडिकॉमच्या "रिजनल हेड" पदावरील व्यक्तीचा माफीनामा तेथे "लोकसत्ता इफेक्ट" नावाने छापून आला.
येथे आपली खुमखुमी जिरवणे मला अभिप्रेत नसून इतर कोणाला असा त्रास होऊ नये किंवा त्या ट्रॅव्हल कंपनीशी व्यवहार करताना इतरांनी काय काळजी घेणे आवश्यक आहे हे इतरांना सांगणे आवश्यक आहे म्हणून तरी ते वृत्तपत्रात छापणे आवश्यक आहे. सतीश जकातदार "अर्थवृत्तांत" मध्ये इंटिग्रिटी, एथिकल बिझनेस वगैरे बडबड करत असतातच, त्यामुळे लोकसत्तेतच छापून आणले तर अधिक उत्तम.
अर्थात चतुरंग किंवा लोकरंगमध्ये छापून येण्यासाठी त्या पुरवण्यांच्या संपादकांशी आधी बोलले तर ते चांगले. चतुरंगच्या शुभदा चौकर यांचा मोबाईल क्रमांक लेखाखाली आधी छापून यायचा आता तो येत नाही.
मनोगतावर कोणी पत्रकार नाही का? जो याबाबत काही मार्गदर्शन करू शकेल.
अवांतरः सचीन हा शब्द "सचीन" असा का येत आहे. मी पहिली वेलांटी दिली तरी तो सचीन असाच होतो. सचीन बरोबर की पहिली वेलांटी वाला सचीन?