छायाताई, तुम्हाला आलेला अनुभव संतापजनकच आहे. पण हे कुठल्या वर्तमानपत्रात छापून येईल अशा भ्रमात राहू नका. जसे सगळ्या राजकीय पक्षांचे आतून संगनमत असते तसेच हे सर्व तथाकथित उच्चपदस्थही आतून एकच असतात. हे निलाजरे संयोजक ज्या वर्तमानपत्रांतून अशा कार्यक्रमांच्या जाहिराती करतात त्यांना काय हा दरवर्षीचा प्रकार माहिती नसतो ?  तुमची अशी भाबडी समजूत असेल तर तुम्ही हल्लीच्या व्यावसायिक जगाला ओळखले नाही असे वाटते.