प्रियाली इतक्या सविस्तर उत्तराबद्दल अनेक धन्यवाद. माझा स्वतःचा इतका अभ्यास नाही त्यामुळे जास्त काही लिहण्याचे टाळते. युगांत बरेच वर्षांपूर्वी वाचले होते, त्यामुळे सगळेच संदर्भ पाठ नव्हते. तुम्ही वरील संदर्भ जो दिला आहे की वरील सगळे विचार युधिष्ठिराच्या मनात प्रथम आले आणि कुंतीच्या नाही, युगांतमध्ये याच्या विरूद्ध मुद्दा दिसतो. हे सगळे विचार कुंतीच्या मनातले दाखवले आहेत, अगदी बाकी व्यक्तींच्या प्रकरणात देखील द्रोपदी, कर्ण वगैरे. (इथे मला वाद घालायचा नाही आहे, वर म्हटल्याप्रमाणे माझा इतका अभ्यास नाही फक्त दोन्ही लेखकांचे जे विचार ठळकपणे वेगळे वाटले ते सांगावेसे वाटले, इतकेच.)
जाता जाता असेही सांगावेसे वाटते की ईरावती कर्व्यांनी, भांडारकर इन्स्टीट्यूटने काढलेली महाभारताची संशोधक आवृत्ती वापरली आहे. त्यांनी प्रस्तावनेत आणि ठिकठिकाणी असेही नमुद केलेले आहे, की बऱ्याच गोष्टी आपल्याला महाभारतात आहेत असे वाटते, पण त्या नंतर मागाहून घुसवलेल्या वाटतात.
सखी.