खरंखरच हा अनुभव दुर्दैवी आहे. माझी आई आणि काकूही या कार्यक्रमाला गेल्या होत्या. त्यांनाही २४व्या रांगेत बसावं लागलं आणि जेवणानंतर तुमचा झाला तसा सत्याचा जय होणं त्यांच्या नशिबी नसल्याने ३०व्या.
एखाद्याकडे आशाताईंचा पत्त असेल तर या लेखाची प्रिंट पाठवून द्या (अर्थात लेखिकेच्या परवानगीनेच). त्यांना कदचित कल्पना नसेल या सगळ्याची. बाकी प्रत्येक वर्तमानपत्रात याची पर्चा झालीच पाहीजे.
खरंतर हे असं होणं हे नेहेमीचं (म्हणजे सगळ्या अश्या सांस्कृतिक कार्यक्रमात) नसावं.. कारण दरवर्षी आम्ही चतुरंगच्या स्नेहसंमेलनाला जातो. तिथे हा प्रकार कधीच होत नाही.