आम्हीही या कार्यक्रमाला येणार होतो. पण पनवेल, २३०० रू तिकीट, वेळ या सर्व गोष्टींनी इच्छेवर मात केली.
पण आपला अनुभव वाचून परत कॉमन मॅन च्या अगतिकतेबद्दल संताप आला. या अनुभवाची मौखिक प्रसिद्धी आम्ही करुच, पण आपण निरनिराळ्या वर्तमानपत्रांना हा अनुभव पाठवा, सचिन वाले ज्यांचे प्रायोजक नाहीत असे काही निघतीलच.
'असे होते कधीकधी, वाईट अनुभव येतात, त्याचं इतकं काय?सारखं काय रडायचं?' म्हणणं तो वाईट अनुभव आपल्याला आलेला नसतो तेव्हा अधिक सोपं असतं.आपला अनुभव वाचताना जागोजागी आपल्या गटाच्या जागी आम्ही वाचक स्वतः असल्यासारखं वाटून संताप येत होता.
तसेच माउथशट.कॉम नावाचे संकेतस्थळ आहे त्यावरही ग्राहकांना एखाद्या उत्पादनाचे आलेले अनुभव देता येतात. हा अनुभव त्यात मोडेल की नाही याची कल्पना नाही.