चांगला अनुभव. लहान मुलांचे भावविश्व हे असेच असते. जी. एं. नि लिहिलेला एक अनुभव असा. एका लहान मुलीजवळ एक प्लॅस्टिकचा तुकडा की असेच काहीसे होते. 'ती अडगळ कशाला ठेवलीस?' असे तिला विचारल्यावर ती म्हणाली 'पण त्याच्याकडे पाच मिनिटे बघत राहिले की तो मला गोष्ट सांगू लागतो!'