<<आता आपण ठरवायचं की कॅमेरा नीट वापरून त्याचं लाइफ वाढवायचं की उगीच हमी चे पैसे फुकट घालवायचे ...

५००० रुपये ही काही लहान किंमत नाही...>>

योग्य मुद्दा! आस्थापनेच्या नावे खरेदी करून चोपडीमध्ये खर्च दाखवून घसारा वसूल करायचा असेल वा चित्रशाळेसाठी बँक कर्जे घ्यायचे असेल अशा काही परिस्थिती सोडता कुणी उगाच पैसे जास्त मोजणार नाही. सर्वसामान्यता बिनदेयकाची बिनपावतीचीच खरेदी केली जाते कारण ते स्वस्त पडते. हमीसह विक्रीचा उल्लेख करण्याचा उद्देश इतकाच की ज्या अर्थी हमी दिली जात आहे त्याअर्थी सुटे भाग आणि दुरुस्तीज्ञान उपलब्ध आहे.

आपण स्वतः व्यावसायिक असल्याने माहित असेलच की एखादा कॅमेरा सेवा केंद्रात दुरुस्तीला देण्यापेक्षा तिथे काम करणाऱ्या कडून खाजगीतून दुरुस्ती करून घेणे स्वस्तात होते. म्हणजेच आता कॅनन, फुजी, पॅनासोनिक, ऑलिंपस वगैरेचा विचार करायला हरकत नाही.