अनु,
अनुभव बोलका आहे आणि खरोखरीच संतापदायक आहे आयडिया चं प्री पेड कार्ड पोस्ट पेड ला कन्व्हर्ट केलं तेंव्हा ११०० रु. चा बॅलन्स एका महिन्यात संपवून दाखवला होता त्या लोकांनी. मोबाईल फोनचं बिल सहाशे रुपये वगरे आलं म्हणजे अबम्हण्यम् असं मानायचे दिवस होते ते. बरीच भांडाभांडी करूनही काही उपयोग झाला नाही.
पण कालच सर्वोच्च न्यायालयाने कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी मारहाण केल्याबद्दल आयसीआयसीआय बँकेला पंचावन्न लाख रुपयांचा दंड केला आहे अशी बातमी वाचली. मला वाटतं या लोकांना असाच धडा शिकवावा लागतो.
काहीही सेवा न देता किंवा अत्यंत हीन दर्जाची सेवा देऊन वर परत आपल्याकडून सेवा कर वसूल करणाऱ्या एअरटेल सारख्या कंपन्यांना मोकळं सोडता कामा नये असं वाटतं. कदाचित आपल्याला न्याय मिळेल न मिळेल पण अन्यायाविरुद्ध आवाज उठवल्याचं समाधान नक्कीच मिळेल. काठावर उभं राहून सल्ले देणं सगळ्यात सोपं असल्यामुळे " ग्राहक न्यायालयात जा आणि एआटेल ला धडा शिकव " असा अनाहूत सल्ला दिल्याशिवाय राहवत नाही.
काही मदत लागल्यास नक्की सांग!
--अदिती