अनुताई,
(संबोधन खटकल्यास क्षमस्व... पण नुसतं 'अनु,' हे काही ठीक वाटलं नाही. असो.)
मी तर केवळ '१२१' या कधीही कुठेही उपलब्ध असणाऱ्या (आणी काहीही उपयोग नसलेल्या!) ग्राहकसेवेमुळे एअरटेलला सोडचिठ्ठी देण्याच्या विचारात आहे...
अजूनही उपरोल्लेखित त्रास चालूच असेल, तर हा उपाय करून बघाः
१. http://www.airtel.in/ वर जाऊन तुमचा मोबाईल नं. रजिस्टर करा.
२. SMS मध्ये पासवर्ड येईल, तॉ वापरून login करा (आणी लगेच पास. बदला!!)
३. आतमध्ये 'complaints & requests' मध्ये जाऊन तुमची तक्रार नोंदवा. त्याचा तक्रार क्र. तुम्हाला लगेच मिळेल.
४. हा क्र. sms मध्येही येतो, तो जपून ठेवा. त्यानंतर तुम्हाला एअरटेलकडूनच फोन येईल.
५. त्यानंतरही काम न झाल्यास व्य. नि. करा.
- (एअरटेलप्रेमी!!!) अथांग