असा अनुभव मलाही आला आहे. 'आमच्या संगणकात लिहिल्याप्रमाणे' हे बहुधा त्यांचे मंत्रघोषाचे वाक्य असावे.
माझ्या बीपीएल प्रीपेड खात्याची वैधता २ ऑक्टो २००७ २३:५९:५९ पर्यंत आहे असा संदेश मला नेहमी माझ्या मोबाईल ची वैधता तपासताना मला मिळत होता. पण त्या दिवशी (२ ऑक्टो ला) फोन लावण्याचा प्रयत्न करताना तो लागत नव्हता. ग्राहक सेवा केंद्राला फोन करून विचारल्यानंतर त्यांनी सांगितले की आमच्या संगणकात असलेल्या माहितीप्रमाणे तुमच्या मोबाईल क्रमांकाची वैधता काल रात्री म्हणजे १ ऑक्टो २००७ ला रात्री १२ वाजता संपली.
मी तिला भरपूर वेळा हे पटवून देण्याचा प्रयत्न केला की ह्या संदेशाप्रमाणे मी आज फोन वापरू शकतो मग ही चुकी का? तिचे आपले एकच पालुपद 'आमच्या संगणकात लिहिल्याप्रमाणे'. शेवटी मला वैधतेकरीता पैसे खर्च करणे भाग पडले.
ह्या आधीही भरपूर वेळा मला नीट सुविधा न मिळाल्याने मी आधी त्यांच्या ग्राहक केंद्राशी संपर्क साधून ते सुधारून घेतले. किंवा मग त्यांच्या वरील अधिकाऱ्याशी बोलून/विपत्राने ह्याचा पाठपुरावा केला.
ग्राहक सेवा केंद्रातील कर्मचाऱ्यांना बहुतेक वेळा काही गोष्टींचे पूर्ण ज्ञान नसते असते हा माझा अनुभव आहे. एक जण एक सांगतो. ५ मिनिटांनी फोन केल्यावर त्याच गोष्टीबद्दल दुसरा दुसरी माहिती देतो.
तुमच्या प्रकरणात तुम्ही ग्राहक सेवा केंद्रातील ते जे कर्मचारी आहेत त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ह्याबाबत माहिती काढावी. वरील प्रकरणात मला ह्याचा फायदा झाला नाही परंतु ह्याआधीच्या काही प्रकरणांत अशाने काहीतरी साध्य होऊ शकते हा अनुभव आहे.
त्यापुढे मग CNBC आवाज वाहिनीच्या 'पहरेदार' ला संपर्क करून (किंवा इतर ही असे कार्यक्रम/वाहिन्या असतील) काहीतरी मार्ग काढू शकता असे वाटते. फायदा कितपत होईल हे सांगणे मलाही अशक्य आहे