१. कोणतीही तक्रार नोंदवल्यानंतर त्या तक्रारीचा क्रमांक मागून घ्यावा व तो टिपून घ्यावा. अनेकदा "सिस्टीम डाऊन आहे. तक्रार नोंदवता येणार नाही." असे सांगतात. थोडासा संयम व चिकाटी हवी. पुन्हा पुन्हा त्यांच्या मागे लागावे.

२.  शक्यतो इमेल किंवा ऑनलाईन सिस्टीमचा वापर करून तक्रार नोंदवावी म्हणजे तक्रार नोंदवल्याचा पुरावा आपल्याकडे राहतो.

३. फोन किंवा एसएमएस करून तक्रार नोंदवली तर त्याचा काही फायदा होणार नाही हे स्वानुभवावरून सांगतो.

४. प्रत्येक तक्रारीचा पाठपुरावा किमान पाचवेळा करावा लागतो असा अनुभव आहे. त्यामुळे पहिल्यावेळी सौम्य बोलून नंतर कडकलक्ष्मीचा पवित्रा घ्यावा. एजंटाने फोन उचलल्यावर लगेच त्याला शिवीगाळ करून मी माझे पैसे तर परत मिळवणारच आहे पण तुमच्या मूर्ख सेवेमुळे मला झालेला मनस्ताप कसा भरून मिळेल ते सांगा असे सुनावले पाहिजे. अशी अनुकूल वातावरणनिर्मिती केल्यानंतरच काय तक्रार आहे ते सांगावे.

५. शक्य असेल तर ग्राहक संरक्षण मंचाकडे तक्रार करावी. मात्र यासाठी वर सांगितल्याप्रमाणे पुरावा असणे आवश्यक आहे. पहिल्यावेळी तुम्ही एसएमएस पाठवला नसतानाही तुमचे १५ रुपये गेले ते जाऊद्या (ते पण जाऊ नयेच*) पण तुम्हाला ती सेवा नको असल्याची तक्रार नोंदवूनही उरलेल्या महिन्यात पैसे गेले हा त्यांचा निष्काळजीपणा आहे त्याचा भुर्दंड सोसण्याचे तुम्हाला काहीच कारण नाही. 

*बऱ्याच वेळा अशी आगंतुक सेवा "बाय डिफॉल्ट" मिळते कारण या कंपन्या ग्राहकहितदक्ष(!) आहेत व अशी सेवा आपल्या हिताची आहे याची त्यांना खात्री आहे. त्यामुळे अशी सेवा नको असल्यास ते वेगळे सांगावे लागते ते सांगितले नाही तर तुम्हाला ते मान्य आहे असे ती कंपनी गृहीत धरते. ही फाईन प्रिंट आपण अनेकदा ध्यानात घेत नाही. ते अशा कंपन्यांच्या पथ्यावर पडते. त्यामुळे पहिला महिना भुताचा असे समजून ते सोडून द्या.