काल संध्याकाळी अचानक सचिन ट्रॅव्हल्सकडून फोन आला, " तुम्ही घरी आहात काय? तुमचा पत्ता सांगा, तुमचे तिकिटाचे पैसे परत करायला येत आहोत." मी आमची एकूण ५ तिकिटे असल्याचे सांगितले. त्यांनी ५ जणांची नावे विचारून घेतली. पण अजून पर्यंत तरी कोणी पैसे घेऊन आलेले नाही. फोन भ्रमणध्वनीवर आल्यामुळे 'सचिन' कडूनच आला होता.
आमची पत्रे कोणत्याही वर्तमानपत्राने छापली नाहीत. 'सचिन'लाही प्रत पाठवली होती पण त्यांनीही दखल घेतली नव्हती. ग्राहक मंचाकडून योग्य मार्गदर्शन मिळाले. बघू काय होते ते. इथे लिहित राहीनच.
सर्वच मनोगतींनी या बाबतीत जी तत्परता दाखवली, त्यावरून संजोप राव म्हणतात त्याप्रमाणे ई-चळवळ उभी रहिल्यासारखे वाटले.
छाया