वोडाफोन होण्याआधी बीपीएल नेही मला असाच वैताग दिला होता. मी नेटाने प्रयत्न केला, स्वतःचे पैसे खर्च करून असंख्य फोन केले, त्यांच्या तक्रार कक्षाला रजिस्टर्ड पत्र पाठवले आणि त्यांनी ती रक्कम माझ्या खात्यावर जमा केल्याचे त्यांचे पत्र आले. त्यानंतर जे बील येईल ते निमूटपणे भरणे आणि आपली काहीही फसवणूक होत नाही अशी स्वतःची समजूत करून घेणे असा पर्याय मी स्वीकारला आहे. एअरटेल झाली (कंपनी म्हणून स्त्रीलिंगी), आयडिया झाली, रिलायन्स झाली, बीपीएल झाली... त्यामुळे सगळे एकजात हलकट लोक आहेत आणि आपण गरजू गाढवे असल्याने आणि संघटित नसल्याने आपली फसवणूक होणे हीच आपली लायकी आहे असा वैफल्यपूर्ण विचार करून मी शांत बसलो आहे!