माझ्यासारखेच कोणीतरी आहे, हाहाहा! माझ्यासारखाच कोणालातरी मनस्ताप होतो आहे नि भुर्दंड बसतो आहे. हाहाहा!  समदुःखी सापडल्याने मला खरंच आनंद झालाय. खोटे का बोला?
काही महिने मी देखील पंधरा रुपये भरत आहे. सगळे करून झाले. फोन केले,एसएमएस केले, यंव केले, त्यंव केले, काहीही उपयोग झाला नाही‌. सेवा बदलल्यावर नंबर बदलणे परवडणारे नाही म्हणून हात दगडाखाली सापडला आहे एवढेच. तरीही दरवर्षी एअरटेललाच सेवा सर्वेक्षणात पहिला नंबर कसा मिळतो काय कळत नाही. भारतात फोन आणि इंटरनेटमध्ये कुणाचीच सेवा चांगली नाही. अतिशय वाईटापासून कमी वाईट एवढाच पर्याय उपलब्ध आहे. वर दिलेला अथांगांचा उपाय करून बघावा म्हणतो.

मध्यंतरी आयडियाने देखील स्विफ्ट जितो स्पर्धेत असाच धुमाकुळ घातला. एका ग्राहकाने २४ हजार बिल येईपर्यंत बरोबर प्रश्नांची उत्तरे दिली. मात्र स्पर्धा संपणार कधी याबद्दल काहीच ठोस माहिती न मिळाल्याने त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात चौकशी वगैरे केली तेव्हा अशा स्पर्धेसाठी आयडियाने काही परवानगी न घेतल्याचे दिसून आले. आयडियाकडे पाठपुरावा केल्यावर त्यांनी प्रकरण दाबण्यासाठी सदर इसमाला युरोप दौरा घडवून आणला. तरीही परत येऊन ते पुढे लढा देणार असल्याचे पेपरात वाचले.