साहित्यिकांनी चिखलफेक करून निवडणुक लढवणे हे चूकच. पण त्यांच्या संबंधी तुम्ही जी भाषा वापरली आहे ती योग्य वाटत नाही. निवडणुक लढवण्याचे त्यांचे उद्देश काय असायचे ते असोत, पण त्यांची चूल नक्कीच साहित्य लिहिण्यावर नाही. तुम्ही या दोघांचे साहित्य वाचले तर तुमच्या लक्षांत येईल की ही कुणी फालतू माणसे नाहीयेत.
प्रशासकांना माझी विनंती आहे की कुणाबद्दलही लिहिताना (मग ते अगदी लालू असले तरी) एका किमान सभ्यतेची पातळी मनोगतींना पाळण्यास सांगावी.