'कळीदार कपूरी पान
कोवळं छान
केशरी चुना' च्या चालीत एकदम चपखल बसतंय!
एकदम नवीन लय वाटते आहे....टवटवीत.  

नदीचा घाट
सावल्या हलती
वाऱ्यात उडाला थवा
घुमे पारवा
डहाळीवरती ॥
किरणांचे वाळू घड्याळ
शांत आभाळ
विरागी वाणी
एकली नाव रांगते
जरा पांगते
निळेसे पाणी ॥
हा काळ न जाई पुढे
सारखा अडे
जिवाचा स्पंद
वाळूत हले कवडसा
कुणाचा ठसा
हालतो रुंद ॥

-------- ह्या सगळ्या कल्पना बेफाम सुंदर आहेत. शब्दयोजना अप्रतिम. उत्कृष्ट वातावरणनिर्मिती---लाजबाब! थोडं लयीला पक्कं केलं तर चांगल्या चालीत बसवता येईल. सिनेमातल्या एखाद्या सिच्युएशनसाठी मस्त होईल.
शुभेच्छा.