दोन्ही पुस्तके मी तरूण वयात वाचली तसेच चाळिशीनंतर पुन्हा वाचली पुस्तक वाचतांना मी लेखकाच्या चष्म्यातून वाचली व पूर्ण आनंद घेतला. खाण्डेकर काय वा देसाई काय भाषा व शैली अप्रतिम. मला असे लिहिणे या जन्मी तरी जमणार नाही. परंतु नंतर विचार करतांना वैद्नानिक द्रुष्टिकोनातून विचार करतो. कर्ण हा शूर नसावा, पळपुटा असावा किंवा कचखाऊ तरी होता असा जरूर निष्कर्ष काढता येतो. उदा. चित्रसेन गंधर्वाकडून पराभूत होऊन तो पळाला. तसेच त्याचे मॅनेजमेंट कौशल्य यथातथाच असावे. व्यवस्थित काळजी न घेतल्यामुळे त्याच्या रथाचे चाक मोक्याच्या क्षणी रुतले. लेखकांनी त्याचे अवास्तव उदात्तीकरण केले आहे.