हे दोन्ही कॅमेरे 'प्रोफेशनल्स चे वाटत नाहीत; ते एस एल आर नसून 'दृश्य बघा आणि टिपा' (पॉइंण्ट ऍण्ड शूट) या प्रकारचे आहेत.
बरोबर!! ते घेणारही नाहीये!
सद्ध्या कॅनोन चे दृश्य बघा आणि टिपा हे कॅमेरे जास्त चांगले जातात आणि निकॉन चे एस एल आर. खरं सांगायचा तर दोन्ही कंपन्यांचे कॅमेरे चांगले असतात पण आपण आपापल्या आवडीवर कॅमेरा बघून घ्यावा.
माझ्याकडे सद्ध्या निकॉनचा प्रतिमाग्राही फितिका सोयीचा एस एल आर आहे, पण दर वेळेला चित्रे उजळून घेणे परवडत नाही
अवांतरः सद्ध्या सोनी ने बाजारात आणलेले कॅमेरे स्वस्त आहेत पण मला एकंदरीतच सोनीचा राग आहे. आणि ते कॅमेरेही खूप भारी आहेत असे नाही.
(निकॉन/कॅनोन भक्त) चिकू