माझ्याकडे सद्ध्या निकॉनचा प्रतिमाग्राही फितिका सोयीचा एस एल आर आहे, पण दर वेळेला चित्रे उजळून घेणे परवडत नाही  

यावर एक तात्पुरता उपाय आहे जो मी अनेकदा करतो. पण डिजीटक कॅमेराचा सर्वात मोठा फायदा आहे (काढा, पहा, न आवडल्यास बाद करा, आणि काढतच राहा जो वर मेमरी कार्ड भरत नाही.) तो फिल्म कॅमेरा कधीच देणार नाही.

मी अनेकदा फिल्म धुवून घेतो पण छापून घेत नाही. त्याऐवजी छायाचित्रे तबकडी वर घेता येतात. खास करून पुण्यात फोटोफास्ट मध्ये ही सोय आहे. मग एक तबकडी भरली की दुसरी. 

स्वानुभवा वरून सांगतोः एस एल आर शक्यतो पावती आणि देखभालीच्या हमी सहच घ्या.