हा विद्रोह नाही की अविवेक. हे गलिच्छ पद्धतीने लिहिलेले गलिच्छ विचार आहेत. तुकारामांची किंवा रामदासांची भाषा रोखठोक असेल, पण ती गलिच्छ नव्हती. आणि जुन्या काळात जी एखादी शब्दरचना चालून जात असेल आणि ती जर आधुनिक काळात असंस्कृत समजली जात असेल तर, 'जुन्या काळात कसे तुम्ही खपवून घेतले' असले विचार हे स्वीकारार्ह नाहीत. क्षत्रिय वंशाचा राम शिकार(हिंसा) करत असेल, दरबारात मद्यप्राशन करीत नृत्यांगनांचा नाच पाहत असेल तर ते तो राजाला शोभेल असेच करत होता असे समजायला पाहिजे. ती मुभा आपल्या खासदारांना नाही.
निवडणुकीला उभे असलेले सर्वच साहित्यिक आदरणीय आहेत. निवडून आल्यामुळे त्यांना फक्त सुविद्य वाचकवर्गाकडून मान मिळणार आहे. करदात्यांकडून एका पैशाचीही प्राप्ती होणार नाही आहे. संमेलनाध्यक्ष हे फक्त शोभेचे पद आहे हे या माणसाला माहीत नसावे हे अनाकलनीय आहे.--