इतरांचे प्रतिसाद वाचल्यावर माझा प्रतिसाद मलाच जरासा विसंगत वाटायला लागला आणि त्याचं स्पष्टीकरण देणं आवश्यक आहे असं वाटलं.
तर त्याचं असं झालं की छायाताईंच्या ५ जणांच्या ग्रुपमध्ये माझे दोन
आप्त होते. त्यांच्याकडून फोनवरून ह्या प्रकाराबद्दल थोडं कळलं
होतं आणि तरीही आशाताईंच्या कार्यक्रमाचा आनंद त्यांना घेता आला हेही त्यांनी सांगितलं होतं.
पण त्यांनी तपशील सांगण्यास मात्र नकार दिला. ते सगळं भयंकर आहे,
प्रत्यक्ष भेटीतच बोलू असे सांगितले. त्यामुळे मला झाल्या प्रकाराच्या
तपशीलाबद्दल उत्सुकता होती. फक्त लेख वाचताना ते सगळं मला
प्रथमच कळत होतं असं नाही. म्हणून माझी प्रतिक्रिया इतरांपेक्षा वेगळी झाली. छायाताईंच्या लेखनकौशल्य अधिक भावलं. संतापाने वळलेल्या मुठी टाळ्या वाजवायला उघडणार कशा?, बंद स्टुडिओतील चंद्र-चांदण्यांची कमतरता क्षणात भरून निघाली, सलही असातसा नव्हताच. इत्यादी. आणि त्यालाच मी प्रतिसाद दिला.