सचिन ट्रॅव्हल्सकडून आम्हाला   १००/- रु. कापून  तिकिटांच्या रकमेचा (रु. २१३२/-) धनादेश मिळाला.

झाल्या प्रकाराबद्दल वृत्तपत्रांतून जाहीर दिलगिरी व्यक्त केली जावी ही आमची मागणी सचिन ट्रॅव्हल्सने मान्य केली नाही परंतु आम्हाला पाच जणांना दिलगिरीचे पत्र देण्याचे त्यांनी कबूल केले होते.

धनादेशासोबतच्या पत्रात मात्र दूरध्वनीवर झालेल्या संभाषणानुसार तिकिटाचे पैसे परत करीत असल्याचे म्हटले आहे. दिलगिरीचा शब्द नाही.

त्यामुळे पैसे मिळूनही समाधान मात्र मिळाले नाही.

छाया