मिलिंद,

परखडपणे तुम्ही हा मुद्दा मांडल्याबद्दल तुमचं अभिनंदन.

मला वाटतं-

डॉ. भोसेकरांचा निषेध केला पाहिजे. त्यांनी (अजून मागितली नसल्यास) लेखक आणि वाचकांची क्षमा मागावी.

लोकसत्तानंही दिलगिरी व्यक्त करून सोबत कणेकरांचा मूळ लेख पुनर्प्रकाशित करावा. तसंच अशा चुका टाळण्यासाठी वृत्तपत्रांकडे स्मरणशक्तीव्यतिरिक्त काय यंत्रणा आहे ह्याचा खुलासा त्यांनी करायला हवा. 

लिखाण महाजालावर उपलब्ध असल्यास समानतेचा शोध घेणं आणि असे गुन्हे पकडणं (भविष्यात तरी) शक्य व्हावं. (या तंत्राच्या शक्याशक्यतेबद्दल जाणकार लोकांनी माहिती द्यावी, ही विनंती.)

- कुमार