हा वेग या जगाचा मज पेललाच नाही
फुटलो उरी तरीही मज थांबता न आले

जगणे असेल माझे पण मालकी न माझी
मी संपतो म्हणालो मज संपता न आले


सुऱेख शेर...शरदराव. आवडले.
..................................................
तुझ्यात मी हीही कविता आवडली. पण पहिल्या कडव्यात तुम्ही वृत्ताची भलतीच सरमिसळ करून ठेवली आहे. वृत्ताची सरमिसळ करायला हरकत नाही; पण त्यातही एक सूत्र सुरुवातीपासून अखेरपर्यंत टिकवून ठेवावे. एका ओळीच एक लय, दुसरीची तिसरीच... असे करू नये. छंदोबद्ध लिहायचे तर गेयता, लय या गोष्टी सांभाळायला नकोत का...?