प्रयत्न छान झाला आहे. पण काही ओळींमध्ये रचनेकडे लक्ष द्यायला हवे असे वाटले.
विशेषतः
'साहू कसा मी हे अधांतर, मला कळेना..' यात एक गुरू कमी असल्यामुळे ही ओळ वाचताच येत नाहीये
कसा साहू मी सांग अधांतर, मला कळेना असे काहीसे केल्यास बरोबर होईल असे वाटते.
त्याचप्रमाणे 'की जीवघेणे हे मध्यंतर, मला कळेना..' याही ओळीत एक गुरू जास्त झाला असावा असे वाटते.
की जिवघेणे हे मध्यांतर , मला कळेना असे केल्यास बरे होईल असे वाटते.
'तुझे असे हे वेषांतर , मला कळेना.. ' या ओळीत तर बऱ्याच मात्रा कमी आहेत.
'विचारता मी काय गुन्हा तो माझा जेव्हा,
का केले मग तू विषयांतर मला कळेना..'
या शेरात , विचारता याचा अर्थ विचारल्यावर असा आहे तिथे जेंव्हा या शब्दामुळे पुनरावृत्ती किंवा रिडंडन्सी निर्माण झाल्यासारखी वाटली.
आपल्या कल्पना खूप सुरेख आहेत. पण कवितेच्या कडव्याचा / शेराचा अन्वय लावल्यास त्यातून एक सलग आणि अर्थपूर्ण वाक्य हाती लागावे अशी किमान अपेक्षा असते असे ऐकले आहे. (चूभूदेघे तज्ञांनी मार्गदर्शन करावे) त्यादृष्टीने रचनेकडे आणि बांधणीकडे अजून काळजीपूर्वक लक्ष दिल्यास आपली कविता खूपच चांगली होईल असे वाटले.
--अदिती