नमस्कार रोहिणी,

बटाटे उकडून कुस्करल्यावर एकदम चिकट झाले; म्हणजे खळीसारखे! मी ते जास्त वेळ उकडले का? मी सगळी पाककृती अर्धी प्रमाणे घेऊन केली. दोन मध्यम बटाटे छोट्या (दीड लि.) कुकर मध्ये ४ शिट्ट्या येईपर्यंत शिजवले. (भात व्हायला चार शिट्ट्या लागतात.)

बटाट्याची खळ घट्ट करण्यासाठी त्यात थोडा टोस्टचा चुरा घातला. कसेबसे वडे केले. चव चांगली होती, पण वडे नाजुक!