सर्वप्रथम सर्वांना धन्यवाद. प्रिय वाचक परवाचा दिवस दिवाळीचा होता. मी लावलेल्या सोज्वळ पणत्या मलाच उजळून टाकत होत्या. लालकेशरी आकाशदिवा एका श्रीमंत संस्कृतीची उब देत होता.
माझ्या मनातही एक निताशामय आनंदी दिवा मला प्रफुल्लित करत होता. एका पणतीतून दूसरी जागवावी इतक्या सहजतेने आनंद कुणीही कुणालाही देऊ शकतो, घेणारा मात्र कृतज्ञ असतो. मी कृतज्ञ आहे आपण सर्वांची, इतकं कौतुक करून आपण मला दिवाळीची सुंदर, नेहमीच स्मरणात राहील अशी भेट पाठवली मी म्हणेल माझ्या लेखापेक्षा तुमचे प्रतिसाद निश्चीतच जास्त सुंदर होते.
आणि हो, 'मी मधुमालतीचा अमृतमय देठ' ही कविता माझीच आहे. माझ्या आजोळच्या बालपणाचे प्रतिक म्हणून लिहिली होती आपण तिला गाणही म्हणू शकता. मी ही ती क्वचित गुणगुणते. पूर्ण कविता कधीतरी नक्की पाठवेन.