वैशालीजी, तुमचा आरोप चुकीचा आहे. स्त्रीला पुरूषाने जी बंधने लावली आहेत ( पिता किंवा पती म्हणून ) ती योग्यच आहेत. त्या बंधनांना बंधन न म्हणता सीमारेषा म्हटले पाहिजे. निसर्गाने स्त्री-पुरूष यांच्या स्वभावात व शरिररचनेत फरक केला आहे. स्त्रीने पुरूष होण्याचा प्रयत्न करू नये. दोघांमध्ये जो फरक आहे तो तसाच राहिला पाहिजे. आजकाल जवळपास सगळेच पुरूष स्वयंपकात स्त्रीला मदत करताना दिसतात. नाही मदत शक्य झाली तर किमान हॉटेलात तरी घेवून जातातच. त्यामुळे तो आरोप चुकीचा आहे. आणि राहिले स्त्रीच्या मताबद्दल, तर उलट स्त्रीयाच अश्रू गाळून नवऱ्याला त्यांच्या मनाप्रमाणे वागायला भाग पाडतात. आई आणि बायको यापैकी कुणाचे ऐकायचे हा प्रश्न आयुष्यभर पुरुषाला पडलेला असतो. आणि बंधने गळून पडलेली स्त्री आज आपण युरोप-अमेरिकेत बघतच आहोत. तुम्हाला तशी मुक्तता अपेक्षित आहे का? ती स्त्री स्वतःला मुक्त मानते पण ती तरी शेवटी काय करते? ती पुरूषांच्या बरोबरीने सगळ्या क्षेत्रात वावरते पण शेवटी स्वतःच्या सुंदर शरिराचा उपयोग करून पुरुषास आकर्षित करून त्याचेकडून काम करून घेते. मग याला स्त्री मुक्ती म्हणता येईल का? शेवटी ती तिच्या स्त्रीत्वाचा फायदा घेवून पुरुषाला जिंकून त्याचीच एक प्रकारे गुलामी करते ना! आखूडात आखूड कपडे घालून मिरवणे ही नक्कीच स्त्री मुक्ती असू शकत नाही. त्या आखूड कपड्यांचा उपयोग शेवटी पुरुषाला काबीज करण्यासाठीच स्त्रीकडूनच केला जातो. मग त्याला मुक्ती कसे म्हणता येईल? आणि ज्याप्रमाणे स्त्री स्वतःचे मत सांगू शकत नाही असे तुम्हाला वाटते, तसेच पुरूषही आयुष्यभर पत्नी च्या मताचा विचार करूनच निर्णय घेत असतो. स्त्री व पुरुष एकमेकांना पुरक आहेत. ते एकमेकांचे बांधील, शत्रू किंवा प्रतिस्पर्धी नाहीत. तुलना आपण तेव्हाच करू शकतो जेव्हा दोन गोष्टींमध्ये काहीतरी साम्य असते. पटले नाही? उदाहरण सांगतो: क्रिकेट आणि चहा यांची तुलना करू शकतो का आपण? कारण क्रिकेट हा खेळ आहे आणि चहा हे पेय. चहा आणि कॉफी तुलना करू शकतो कारण दोन्ही पेये आहेत. पण दोन्ही आपापल्या परिने श्रेष्ठ आहेत. मग तुम्ही म्हणाल की पुरुष आणि स्त्री यात साम्य आहे. दोन्ही माणसेच आहेत. बरोबर आहे. पण ते एकमेकांना पुरक आहेत. दोन्ही आपापल्या ठीकाणी श्रेष्ठ आहेत. स्त्रीने पुरुष आणि पुरुषाने स्त्री होण्याचा प्रयत्न करूच नये.
भारताबद्दल बोलायचे झाले तर, स्त्री ला पुरुषाने नाही, स्त्रीनेच जखडले आहे...सालस सून ही खाष्ट सासूमुळे जखडली जाते. सालस सासू ही कजाग सूनेमुळे जखडली जाते. आख्खे घर हे अनेक स्त्रीयांच्या आपसातील भांडणांमुळेच रसातळाला जाते. मुलाला सांगून सुनेला छळायला लावणारी स्त्रीच. नवऱ्याला सांगून आईला छळायला लावणारी स्त्रीच. स्त्रीला हुंड्यासाठी छळून जाळणारी स्त्रीच आहे. हा सरळ सरळ खुनच झाला की! 'बिनधास्त' या मराठी चित्रपटातील एका डायलॉगनुसार: "दोन पुरुष आयुष्यभर जीवश्च-कंठश्च मित्र असतात, पण दोन स्त्रीयांची अशी दोस्ती कधी ऐकीवात नाही." कारण, दोन स्त्रीया एकत्र आले की भांडण झालेच म्हणून समजा. हॉस्टेल मध्ये एका रूम मध्ये राहणाऱ्या दोन मुली सुद्धा भांडल्याशिवाय राहात नाहीत.
आजच्या सॉफ्टवेअर युगातल्या पुण्या-मुंबईसारख्या शहरात सुद्धा, सॉफ्ट्वेअर ईंजीनिअर मुली सुद्धा फावल्या वेळात कँटीन मध्ये सासू-सून-नणंद-जाऊ-भावजय याच गप्पा मारतांना आढळतात. मी स्वतःच्या कानांनी ऐकले आहे. आता सांगा मला कोणी कोणाला जखडले आहे? आणि कोणाला कोणापासून मुक्ती हवी आहे?