प्रिय शुद्ध मराठी,
मनःपूर्वक धन्यवाद. तुमचे उत्तर वाचून समाधान झाले. संस्कृत अतिशय कच्चे असल्याने वादिन् बिदिन् माहीत असण्याचा प्रश्नच नव्हता.  "मराठीतला 'साद' शब्द हा संस्कृत 'शब्द' शब्दाचा अपभ्रंश आहे" हे मुळीच माहीत नव्हते.  जाताजाता, प्रतिसादक आणि प्रतिसादी दोन्ही योग्य का? आणि धन्यवाद देणारा तो धन्यवादी म्हणायचे का?

धन्यवादी,
चित्तरंजन