animation किंवा animated picture या अर्थाचा मराठी शब्द आहे काय? नसल्यास तो निर्माण आणि रूढ करता येईल काय?
नुकत्याच गाजलेल्या 'अकडम् बकडम् तिकोई तिकडम् जादूकी ताकत बोलो किसमे दम' वाल्या हनुमान चित्रपटाबद्दल मराठीत सांगायचे झाल्यास कोणत्या शब्दात सांगता येईल?
आणि विषय निघालाच आहे म्हणून, याच्याच अनुशंगाने कार्टून याला मराठी शब्द काय आहे? कार्टून म्हणजे मिकी माऊस किंवा ऱोड रनर शो वगैरे धावती कार्टून्स अपेक्षित आहेत. ' चिंटू ' ही हास्यचित्रमालिका असली तरी ती छापील असते. चिंटूला इंग्रजीत कार्टून म्हणता येईल का? तसेच व्यंगचित्र आणि कार्टून यात फरक काय?
--अदिती