मृदुला,
पहिल्याप्रथम माझ्या पध्दतीचे बटाटेवडे करुन बघितले त्याबद्दल धन्यवाद. बटाट्याचे दोन प्रकार असतात. एक पिठूळ बटाटा आणि एक चिकट बटाटा. कसेही असले तरी चालतात. बटाटे जास्त शिजले तरी चालतात, पण कमी शिजुन चालत नाही, कारण नीट कुस्करता येत नाहीत. बटाटे उकडून झाल्यावर रोवळीमधे काढून ठेव म्हणजे पाणी सगळे निघून जाईल, म्हणजे बटाट्याची खळ घट्ट होइल. तू बटाटे व्यवस्थित उकडले आहेस.
रोहिणी