जंगल च्या झाडीत वाघोबा लपले

म्हातारीला पाहून खुदकन हसले

अगं अगं म्हातारे, कुठे चालली?

खाऊ दे, मला आता भूक लागली.

वाघोबा वाघोबा, मला जाऊ दे

लेकी कडचे लाडू मला खाऊ दे

लाडू खाऊन होइन मी लठ्ठ

मग कर तू मला खुशाल गट्ट

दोन-चार दिवसांनी गंम्मत झाली

म्हातारी भोपळ्यात बसून आली

वाघोबाने भोपळा अडवला

भोपळ्याच्या आतून आवाज आला

"कसली म्हातारी कसली कोतारी

चल रे भोपळ्या टुणूक टुणूक !"

मला तरी हे असं आठवतंय ! बघा बरोबर आहे का ते.

लहनपणी आई-बाबानी माझ्या आणि माझ्या बहिणीच्या आवाजात काही कविता record केल्या होत्या. माझ्या आवाजात "चल गं सई, कुठे गं बाइ?" आणि "नाच रे मोरा" या कविता आणि बहिणीच्या आवाजात "चल रे भोपळ्या टुणूक टुणूक !" ही कविता record केली होती.

मोठे झाल्या नंतर देखील आम्ही अधून मधून ती cassette ऐकायचो. त्यामुळे ओळी अजूनही लक्ष्यात आहेत.

असेच अजून एक झुरळा वरचे बडबडगीत आहे.

"एक होतं झुरळ

चालत नव्हतं सरळ

बस मध्ये चढलं

सीट खाली दडलं

तिकीट नाही काढलं

तरी घर गाठलं"

हे सुद्धा बहिणीच्या आवाजात record केल्याचं आठवतंय.