माहीत असलेल्या जगाच्या नकाशाप्रमाणे युरोप (आणि अमेरिका) हे पश्चिमेला आहेत. जपान पूर्वेकडे. भारत आणि त्याचे शेजारी हे भारतीय उपखंडात असे काहीसे. संस्कृतींचा उल्लेख करताना ह्यानुसार पाश्चिमात्य संस्कृती, पौर्वात्य संस्कृती,  भारतीय संस्कृती असा केला जात असावा.  (म्हणजे युरोपीय आणि अमेरिकी लोक स्वतःच्या संस्कृतीबद्दल बोलताना पाश्चिमात्य असेच म्हणत असावेत आणि जपानी/चिनी स्वतःबद्दल पौर्वात्य.)

सूर्योपासना करताना समोर (पुरतः ?) असते ती पूर्व. पाठीमागे (पश्चात) असते ती पश्चिम. (उजवीकडे असते ती दक्षिण आणि उरलेली ती उत्तर?) असे काहीसे असावे. त्यामुळे पाश्चात्य म्हणण्यापेक्षा पाश्चिमात्य असे म्हणणे बरे असे मला वाटते. चू. भू. द्या. घ्या.