दिशादर्शक आणि संस्कृतीर्शकही.
माझा प्रतिसाद अवांतर आहे (मुळ प्रश्न वेगळा आहे याची जाणीव आहे पण तरिही वाटलं म्हणून लिहितोय )
युरोप आणि अमेरिकेसारखेच आहेत. म्हणजे, ढासळती कुटुंब व्यवस्था,खुले सेक्स विचार आणि पराकोटीचे व्यक्तीस्वातंत्र्य वगैरे असलेले देश.
हा समज चुकीचा आहे. अशा अपप्रवृत्ती सगळीकडे आहेत म्हणून ती संस्कृती नव्हे!! युरोप आणि अमेरिकेत ह्या प्रवृत्ती दबून राहात नाहीत इतकंच.. उदा. भारतातही अजून मजबूत कुटुंब व्यवस्था आहे?
की, या सगळ्या देशांत (म्हणजे पौर्वात्य) पण आपल्यासारखीच नातेसंबंध, एकत्र कुटुंबपद्धती, सासू-सून-नणंद-भावजयी वगैरे वगैरे प्रकार आहेत?
हो आहेत. अगदी युरोप अमेरिकेतही नातेसंबंध आणि सासू-सून-नणंद-भावजयी हे प्रकार आहेत. एकत्र कुटुंबपद्धती (जी भारतातही लोप पावते आहे.) हे भारतीय संस्कृतीचे विषेशण आहे पौर्वात्य नव्हे.
पाश्चात्य संस्कृती म्हणजे नेमके काय?
बापरे.. हे म्हणजे भारतीय संस्कृती म्हणजे नेमके काय असा प्रश्न झाला. खरं सांगु? नाही उत्तर देता येणार. मी भारतात असताना चित्रपट/पुस्तकं/लोकांचे अनुभव यामधून जी अमेरिकेची प्रतिमा बांधली होती ती इथे आल्यावर पुर्ण मिटून गेली आहे... त्यामुळे या अनुभवायच्या गोष्टी आहेत.. अमुक एक गोष्ट म्हणजे पाश्चात्य आणि अमुक एक म्हणजे पौर्वात्य असं विभागता येणार नाही पण त्या ठिकाणी गेलात की वेगळेपण जाणवेल.