मी भारतात असताना चित्रपट/पुस्तकं/लोकांचे अनुभव यामधून जी अमेरिकेची प्रतिमा बांधली होती ती इथे आल्यावर पुर्ण मिटून गेली आहे... त्यामुळे या अनुभवायच्या गोष्टी आहेत.. अमुक एक गोष्ट म्हणजे पाश्चात्य आणि अमुक एक म्हणजे पौर्वात्य असं विभागता येणार नाही पण त्या ठिकाणी गेलात की वेगळेपण जाणवेल

वर मी अधोरेखित केलेले तुमचे म्हणणे मला पटले, पण मग अर्थातच 'पाश्चिमात्य संस्कृती' या शब्दाचा तसा विशिष्ट अर्थ उरत नाही आणि आपण मात्र भारतातील तरूण पिढी ला नावे ठेवतांना 'पाश्चिमात्य संस्कृती च्या प्रभावाखाली भरकटलेली पिढी' असे काहीसे म्हणत असतो.

ते ठीक आहे. पण तरीही, माझा मूळचा मी उपस्थित केलेला प्रश्न अजून अनुत्तरितच आहे. ते तुम्ही तुमच्या प्रतिसादाच्या सुरुवातीलाच सांगितलेच आहे. आता आणखी काही प्रतिसादांची वाट बघूया.