ह्यातील काही फोटो माझ्या तर काही माझ्या मित्रांच्या कॅमेऱ्यातुन काढले आहेत. तसेच येथील कारंजाचे पहिले दोन फोटोज विकिपिडियावरचे आहेत. मेघद्वाराचा दुसरा फोटो आणि कारंज्याचा तिसरा फोटो माझ्या कॅमेरातील आहेत. मी सहसा दिवसाचे फोटोज ऑटो फोकस, ३मेगापिक्सल (उन असल की मी पिक्सल्स कमी करतो), खुप उन असेल तर ०.८ प्रकाश आणि ऊन अजिबात नसल्यास/ढगाळ वाअतावरणात १.४पर्यंत प्रकाश (brightness) ठेवतो. रात्रीचे वरिल प्रमाणे फोटोज मलाही काढता येत नाहीत.

माझ्याकडे सोनी डीएस २, ६ मेगापिक्सल, १२X झुम कॅलेरा आहे.

शेवटचा सगळ्यांना (माझ्यासकट) आवडलेला फोटो माझ्या जुन्या रुममेटने काढलेला आहे. त्याच्याकडेही तोच कॅमेरा आहे. (त्याचाच बघून मीही घेतला पण शेवटी कातडं पांघरूनही गाढव रेंकतच  ) त्याचे काढलेला असाच एक न्यूयॉर्कचा फोटो  इथे बघा (ऑर्कुटचे सभासद असणे आवश्यक) तो फक्त ६मेगापिक्सल इतकच सेटिंग बदलतो आणि मोड नाईट करतो. बहुतेक:) विचारून सांगिन

उरत उरला मेघद्वाराचा पहिला फोटो. तो काढला आम्हीच आहे (कोणाचा कॅमेरा आठवत नाही), पण 'पिकसा'मधून डिजिटल संस्करण केलेला आहे  

सर्वांचे प्रतिसाबद्दल धन्यवाद!!