मिलेनियम पार्क मस्तच आहे. नेवी पीअरही आम्हाला खूप आवडतं. वर्षातून एक ट्रिप होतेच होते या ठीकाणी पण शिकागोला सर्वात आवडत असेल तर डेव्हॉन स्ट्रीटवरील सुखाडियाकडचे चाटपदार्थ आणि लेमाँटच्या देवळातला मसाला डोसा. (हा डोसा खायलाच आम्ही देवळात जातो.  )

पण कावळे का बुवा दिसले नाहीत अमेरिकेत? आमच्याकडे कावळे, चिमण्या, बगळे, कार्डिनल्स, पारवे, करकोचे, बदकं, हंस, ससाणे, घारी आणि कॅनेडियन गूज अगणित आहेत. विशेषतः रानाच्या बाजूला ससाण्याच्या आकारांचे डोमकावळे (ravens) दिसतात. अर्थात, मुंबई-पुण्याच्या मानाने कावळे कमी आहेत.