खेद आणि संताप वाटायला लावणारी घटना. या सर्व सबबी देणाऱ्या लोकांच्या घरात जाउन पाहिले तर नक्कीच स्वच्छता असेल. मग तीच स्वच्छता उंबरठ्याच्या बाहेर पाळायला का जड जाते? यात धर्माचा संबंध पाहून लॅटरल थिंकींग किती दूरवर जाउ शकते याचे नवल वाटले. प्रत्येक गोष्टीमध्ये धर्माला आणलेच पाहिजे का? धर्मामुळे झाले इतके वाटोळे पुरेसे नाही का? रस्त्यावर थुंकणाऱ्यांना दंड करण्याऐवजी आंजारले गोंजारले जाते याला काय म्हणावे? प्रश्न बरेच अहेत, उत्तरे नाहीत. चलता है ऍटीट्यूड कुठपर्यंत रुजला आहे हे जाणवले म्हणजे चीड येते. हे आपले राजकारणी, लोकांनी निवडून दिलेले नेते. लोकशाही ही इतर पद्धतींपेक्षा उजवी आहे, पण असे प्रकार पाहिल्यावर लोकशाहीच्या संकल्पनेचा किती चुकीचा अर्थ घेतला जाउ शकतो हे लक्षात येते.
हॅम्लेट